चोपड्यात शुक्रवारी बांगलादेशी अत्याचारा विरूद्ध मोर्चा व बंद..

चोपड्यात शुक्रवारी बांगलादेशी अत्याचारा विरूद्ध मोर्चा व बंद


चोपडा – सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशी हिंदू समाजासह,बौध्द,जैन समाज नागरिकांवर क्रुर अत्याचार होत आहेत.महिला,मुलींवर घृणास्पद कृत्य समाज कंटकांकडून केले जात आहेत.त्याचप्रमाणे मंदिरे व श्रध्दास्थाने जिहादींकडून लक्ष्य केली जात आहेत,तोडफोड केली जात आहे.या अन्याय अत्याचाराविरुध्द आवाज उठविण्यासाठी निषेध मोर्चा तसेच या अन्यायग्रस्त बांधवांना भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जळगाव जिल्हा बंद मध्ये सहभागी होवून चोपडा तालुका सकल हिंदू समाजातर्फे दि.१६ रोजी शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे.तसेच सकाळी ९ वाजता विश्रामगृहापासून मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.तरी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून,नागरिकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी केले आहे.

Recent News

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले