अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या 20 वर्षीय युवकास चोपडा शहर पोलिसांनी केले जेरबंद..

चोपडा (प्रतिनिधी) आज दिनांक 21 रोजी पोलीस निरीक्षक पवन देसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की चोपडा शहरात कान्हा वाशिंग सेंटर जवळ एक 20 ते 22 वयोगटातील इसम त्याने अंगात ग्रे रंगाचा शर्ट व काड्या रंगाची पॅन्ट घातलेला हा फिरत असून त्याचे कब्जात गावठी बनावटीचा कट्टा आहे त्यावरून पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पोलीस अंमलदार व पंच यांचे सह बातमीची खात्री केली असता कान्हा वाशिंग सेंटरच्या थोड्या अंतरावर मुस्लिम कब्रस्तानाजवळ 6 वाजता मिळालेल्या बातमी मधील इसम फिरताना दिसला त्यास पकडण्यास गेले असता तो पळून जाऊ लागला त्याचा पोलिसांनी पाठलाग केला असता पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ पाटील व निलेश वाघ यांनी पकडले.

त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव दुर्गेश दिवाण पाटील वय वीस वर्ष राहणार गणपती मंदिराजवळ अरुण नगर चोपडा जिल्हा जळगाव असे असल्याचे सांगितले मिळून आलेल्या इसमाचे कब्जात कमरेला मागील बाजूस शर्टचे खाली 80,000/- रुपये किमतीचा एक काड्या रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा पिस्तोल मॅकझिनसह मिळून आला तसेच पॅन्ट चे खिशात 5000/- रुपये किमतीचे एक पितळी धातूचे जिवंत काडतूस मिळून आले. तसेच 15000/-रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण 1,00,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर इसम हा गैर कायदा विनापरवाना गावठी बनवलेला कट्टा व जिवंत काडतूस त्याच्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल निलेश वाघ यांनी सरकारतर्फे तक्रार दिली असून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे आर्म एक्ट कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्रीकांत ढीवरे पोलीस अधीक्षक जळगाव,अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केली असून सोबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहाय्यक फौजदार दीपक विसावे, पोलीस हवालदार संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ पाटील, विनोद पाटील, आकाश पाटील, निलेश वाघ यांनी योग्य ती मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More