चोपडा शहरात दि 24 रोजी रात्री 11 वाजेचा सुमारास भोकरवाडा चौकीमागे सार्वजनिक शौचालयाजवळ तापुरत्या पत्री शेडमध्ये मुबारक अली मुजफर अली वय 30 वर्षे रा भोकरवाडा चोपडा याचे मालकिचे तात्तपुरत्या पत्री शेडमध्ये एकूण 2,50,000/- रु किमतीचे एकुण 07 गुरे त्यात 02 गायी व 05 गो-हे (बैल) असे दाटीवाटीने, जखळून क्रूर रितीने बांधुन त्यांना कोणत्या प्रकारे चारा पाण्याची सोय न करता व त्यांना कोणत्याही प्रकारेचे कानाला टॅग न लावता गुरे बांधुन ठेवलेले मिळून आले म्हणून गुन्हा वगैरे मजकुरचे फिर्याद वरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनाक 25 रोजी पहाटे 04.00 वा सुमारास नागलवाडी गावाच्या गावाचे नाल्याचे जवळील महादेव मंदिराजवळ रोडवर सार्व जागी.दोन अज्ञात इसमांनी त्याच्या ताब्यातील 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 10 गुरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना जखडून बांधुन व त्यांना चारापाणीची व्यावस्था न करता पायी हाकीत असतांना मिळून आले म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक सो यांचे आदेशान्वये राजेंद्र पुंडलिक कोळी यांचे कडेस देण्यात आलेला आहे.












