चोपडा तालुक्यात पावसाचा हाहाकार; गूळ धरणाचे ३ दरवाजे उघडले, अनेक रस्ते बंद अन् वाहतूक ठप्प

चोपडा तालुक्यात पावसाचा हाहाकार; गूळ धरणाचे ३ दरवाजे उघडले, अनेक रस्ते बंद अन् वाहतूक ठप्प

महाराष्ट्र9​न्युज नेटवर्क चोपडा (विशेष प्रतिनिधी)

चोपडा तालुका आणि परिसर क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. गूळ धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची आवक झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे ३ दरवाजे ०.२५ मीटरने उघडून नदीपात्रात २५०० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग ३००० ते ४००० क्युसेक्सपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.रत्नावती नदीला २००६ नंतर प्रथमच महापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चोपडा शहरातील रत्नावती नदीला २००६ नंतर म्हणजे तब्बल २० वर्षांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे.

पुरामुळे विविध मार्गांवरील वाहतूक विस्कळीत:

​गोरगावले मार्ग बंद: गोरगावले बुद्रुक व गोरगावले खुर्द या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू असून, पुराच्या पाण्यामुळे बाजूचा वळण रस्ता खचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

​चोपडा-अमळनेर संपर्क तुटला: अमळनेर तालुक्यातील देवळी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने चोपड्याकडे येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.गरताड-कुरवेल मार्ग बंद: रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक सुरक्षा म्हणून रोखण्यात आली आहे.होळनांथे-मोहिदा पूल बंद: होळनांथे (शिरपूर) व मोहिदा (चोपडा) दरम्यान असलेल्या पुलाच्या उंचीपर्यंत पाणी पोहोचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गावकऱ्यांनी स्वतः रस्ता बंद केला आहे.

​झाडे पडल्याने अडथळा: चोपडा-चुंचाळे-चौगाव-लासुर रस्त्यावर झाडे पडल्यामुळे रस्ता काही काळ बंद पडला होता. मात्र, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ झाडे हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला केला आहे.

तालुक्यात २४ तासांत ११६.१४ मिमी सरासरी पाऊस झाला आहे.

​तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात गेल्या २४ तासांत ३३७.९१ मिमीच्या प्रोग्रेसिव्ह पावसाच्या तुलनेत तब्बल ८१३.०० मिमी एकूण (सरासरी ११६.१४ मिमी) मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

महसुल मंडळनिहाय झालेला पाऊस (मिमी मध्ये)

​अडावद: १४०.०० मिमी,​चहार्डी : १४०.०० मिमी,चोपडा: १३५.०० मिमी,​धानोरा: १३०.०० मिमी,गोरगावले: १२०.०० मिमी,​लासुर: ८५.०० मिमीहातेड: ६३.०० मिमी पाऊस पडला

प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

​गूळ नदीकाठच्या व पूरप्रवण क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी (गूळ मध्यम प्रकल्प उपविभाग, चोपडा) व जिल्हा प्रशासन चोपडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More