आषाढी एकादशी निमित्त वारकरी शिक्षण संस्थेला किराणा वस्तूंचे वाटप # पंढरपूर दिंडीचे संचालक जगन्नाथ बाविस्कर यांचा स्त्युत्य उपक्रम..

आषाढी एकादशी निमित्त वारकरी शिक्षण संस्थेला किराणा वस्तूंचे वाटप # पंढरपूर दिंडीचे संचालक जगन्नाथ बाविस्कर यांचा स्त्युत्य उपक्रम..

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा 

चोपडा (प्रतिनिधी) :- येथुन तिर्थक्षेत्र पंढरपूर पर्यंत संकीर्तन आषाढी वारी पायी पालखीरथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.दिंडी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) यांनी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने नियोजनबध्द पध्दतीने दिंडीचे आयोजन केलेले होते. प्रथम वर्ष दिंडीकार्य यशस्वी झाल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यानिमित्ताने मौजे बोरअजंटी येथील ग्यानवी वारकरी शिक्षण संस्थेला जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दिंडी संचालक जगन्नाथ बाविस्कर, पोलीस पाटील प्रवीण सुलताने, दिंडीसेवक वैभवराज बाविस्कर, भरत पाटील विदगावकर, पवन पाटील पिंप्राळा, श्री.जावरेसर लासुर यांचे शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.दिपक महाराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बालवारकरी विद्यार्थ्यांनी हरिपाठ घेऊन विठ्ठल नामाच्या जयघोषात अभंग भजने गवळणी सादर केल्यात. संस्था स्थापनेला चार वर्षे झाले असून ह्यावर्षी चाळीस विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असुन त्यापैकी विस विद्यार्थी बालकिर्तनकार आहेत. संस्थेला चोपडा येथील बालमोहन विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही सहकार्य लाभत असते.

तालुक्यात एकमेव बोरअजंटी येथे हि ग्यानवी वारकरी शिक्षण संस्था असून ह्या संस्थेला कुठलेच शासकीय अनुदान नसुन वैयक्तिक मदतीने हि संस्था सुरू आहे. म्हणून तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी सत्पात्री दानधर्म देणगी (किर्तनकार दिपक महाराज यांच्या फोनपे ८८३०२३३७९३ ह्या नंबरवर) तसेच वस्तूरूपी मदतसेवा करावी, असे आवाहन चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्ज प्रकरण: चोपड्यात आंबेडकरी समाजातर्फे तीव्र निषेध मोर्चा #केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर

Read More