जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ७१,७०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क जळगाव
शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी तब्बल ७१ हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना जळगाव येथील उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक (Surveyor) राहुल ताराचंद कोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. आज (दि. २९ जुलै) फरांज (ता. जळगाव) येथील बस स्टॉपवर ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात एका कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटरचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.
आरोपींची नावे
राहुल ताराचंद कोळी (वय ३२, भूकरमापक, वर्ग-३, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव)
कल्पेश सोमनाथ पाटील (वय ३२, डेटा एंट्री ऑपरेटर – कंत्राटी, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव) 
प्रकरणाचा थोडक्यात तपशील
तक्रार: एका ४९ वर्षीय शेतकरी तक्रारदाराने त्यांच्या शेतीच्या गट हिस्सा व पोट हिस्सा याची पडताळणी व मोजणी करण्यासाठी जळगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून शासकीय चलन भरले होते.
लाचेची मागणी: या कामासाठी आरोपी क्र. १ राहुल कोळी याने तक्रारदाराच्या भावाकडे सुरुवातीला ७०,०००/- रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी १७ जुलै २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली.
पडताळणी: तक्रारीच्या पडताळणीदरम्यान आरोपी क्र. २ कल्पेश पाटील याने नोटिसा पाठवण्यासाठी स्टॅम्प फी म्हणून ६२५/- रुपयांची मागणी केली. तर २९ जुलै रोजी मोजणीच्या वेळी राहुल कोळी याने स्वत:साठी व ऑफिससाठी ७०,०००/-, नोटीस खर्चासाठी १२००/- आणि खाजगी मदतनीसासाठी ५००/- अशी एकूण ७१,७००/- रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
सापळा आणि कारवाई:
आज (दि. २९ जुलै २०२६) ठरल्याप्रमाणे जळगाव तालुक्यातील फरांज येथील बस स्टॉपवर एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ७१,७००/- रुपये लाच स्वीकारताना भूकरमापक राहुल कोळी याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, ७अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप मैराळे व श्रीमही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप मैराळे व श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे (नंदुरबार, कॅम्प जळगाव) आणि त्यांच्या पथकाने (सुरेश पाटील, संगीता पवार, प्रदीप पोळ, भूषण पाटील, मनोज पाटील) केली.ती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे (नंदुरबार, कॅम्प जळगाव) आणि त्यांच्या पथकाने (सुरेश पाटील, संगीता पवार, प्रदीप पोळ, भूषण पाटील, मनोज पाटील) केली.
नागरिकांना आवाहन:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास निर्भयपणे एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.












