चोपडा येथे ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत’ संपन्न ४९ प्रकारणे सामोपचारासाठी ठेवण्यात आली होती त्या पैकी एक दावा दोन्ही पक्षांच्या परस्पर सामंजस्याने कायमचा मिटवण्यात आला

चोपडा येथे ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत’ संपन्न ४९ प्रकारणे सामोपचारासाठी ठेवण्यात आली होती त्या पैकी एक दावा दोन्ही पक्षांच्या परस्पर सामंजस्याने कायमचा मिटवण्यात आला

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​चोपडा:

नागरिकांना जलद, सुलभ आणि सामोपचाराने न्याय मिळावा या उद्देशाने तहसील कार्यालय, चोपडा येथील बैठक सभागृहात १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालती’चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

​कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.

​लोक अदालतीचे महत्त्व व उद्देश

प्रास्ताविकात भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.महसूल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी स्तरावर मामलेदार अधिनियम कलम ५, महाराष्ट्र महसूल संहिता कलम १४३, बांध फोडणे, पाण्याचे प्रवाह अडवणे तसेच कुळ कायद्याअंतर्गत अनेक दावे दाखल असतात. हे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ, पैसा खर्च होतो आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोड झाल्यास या सर्व त्रासांतून सुटका होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

​प्रलंबित दाव्यांवर सामोपचाराने तोडगा

या लोक अदालतीमध्ये एकूण ४९ प्रकरणे सामोपचारासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रयत्नांना यश येऊन मौजे गरताड येथील एक महत्त्वपूर्ण दावा दोन्ही पक्षांच्या परस्पर सामंजस्याने कायमचा मिटवण्यात आला.

​प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन

​अध्यक्षस्थान: मा.दीपक धनगर (दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, चोपडा) यांनी अध्यक्षस्थानावरून जास्तीत जास्त दावे लोक अदालतीत निकाली काढण्याचे आवाहन केले.विशेष उपस्थिती: सरकारी अभियोक्ता अॅड. नितीन माळी, न्यू चोपडा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सी. बी. सोनवणे.सक्रिय सहभाग: वरिष्ठ वकील अॅड. प्रसाद काबरे, अॅड.डी.एस.सोनार, अॅड आय.आर.पाटील, अॅड. किरण जाधव, अॅड. विशाल एस. पाटील, अॅड. दीपक पाटील आणि . विशाल शिंदे यांनी वाद मिटवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

​सूत्रसंचालन व आभार

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल कुलकर्णी यांनी केले, तर आभारप्रदर्शन निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी अरुण वसावे व श्रीमती वंदना दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More