सततची नापिकी अन् कर्जाचा डोंगर; चोपडा तालुक्यातील अडावद येथे ३६ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सततची नापिकी अन् कर्जाचा डोंगर; चोपडा तालुक्यातील अडावद येथे ३६ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​अडावद (ता.चोपडा)

सततची नापिकी, पिकांना न मिळालेला योग्य भाव आणि त्यातच यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे भविष्यात कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तालुक्यातील अडावद येथील एका ३६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची वेदनादायक घटना घडली आहे. विजय ऊर्फ बंटी प्रताप माळी (वय ३६, रा. वरचा माळी वाडा, अडावद) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत विजय माळी हे आपल्या चार बिघे शेतीवर कुटुंबाचा गाडा हाकत होते. गतवर्षी त्यांनी शेतात मूग, उडीद व कांद्याचे पीक घेतले होते; मात्र कांद्याला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने लागवडीचा खर्चही निघाला नव्हता. तरीही खचून न जाता त्यांनी यंदा मोठ्या आशेने हातउसनावारी करून आणि क्रेडिट कार्डवरून कर्ज काढून मक्याची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी मक्याचे पीक पूर्णपणे करपून गेले. त्यानंतर पुढील कांदा लागवडीसाठी तयार केलेले रोपसुद्धा पावसाच्या अनिच्छेने नष्ट झाले.

​नापिकीमुळे डोक्यावर साचलेले कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या चिंतेत विजय माळी गेल्या काही दिवसांपासून होते. याच विवंचनेतून त्यांनी १८ तारखेला दुपारी शेतातील झाडाला ठिबक सिंचनाच्या नळीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

​घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डॉ. सुरेश पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १९ तारखेला सकाळी १० वाजता अडावद येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

​मृत विजय माळी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे अडावद परिसरासह चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More