चोपड्यात पाचव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप; मिरवणुकीनंतर रस्ते गुलालाने माखले, पालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम!
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा:
मागील काही काळात चोपडा शहरातील गणेशोत्सव संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत खास ठरत आहे. गणपती आगमन सोहळ्यापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या भव्य उंच मूर्ती आणि गुलालाची तुफान उधळण यामुळे चोपड्याच्या गणेशोत्सवाला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपड्यात पाचव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात व अतिशय उत्साहात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शहरातील सर्वच गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक एकाच मार्गाने जात असल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरवणुकीनंतर रस्ते गुलालाने माखले; पालिकेची तत्परता
विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या गुलालाच्या उधळणीमुळे शहरातील मुख्य रस्ते पूर्णपणे गुलालाने माखले होते. मिरवणूक पार पडल्यानंतर चोपडा नगर परिषद प्रशासनाने शहरात तातडीने व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली. 
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षनगर परिषदेच्या मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक राठोड आणि स्वच्छता निरीक्षक सौ. भोसले यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेचे कंत्राटी व कायमस्वरूपी मिळून सुमारे ७० ते ८० कर्मचारी पहाटे ४ वाजेपासूनच झाडू आणि ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले.क राठोड आणि स्वच्छता निरीक्षक सौ. भोसले यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेचे कंत्राटी व कायमस्वरूपी मिळून सुमारे ७० ते ८० कर्मचारी पहाटे ४ वाजेपासूनच झाडू आणि ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले.
१० ते १२ ट्रॅक्टर गुलालाची विल्हेवाट
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या काही तासांतच सुमारे ८ ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आला. उर्वरित भागातून अजून ३ ते ४ ट्रॅक्टर गुलाल गोळा होण्याचा अंदाज असून, एकूण १० ते १२ ट्रॅक्टर गुलालाची विल्हेवाट लावली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि नगर परिषदेची ही तत्पर स्वच्छता मोहीम यामुळे चोपडकरांनी समाधान व्यक्त केले आहे.












