चोपडा पालिका करवसुलीत जिल्ह्यात अव्वलअभिनव उपक्रमाला शहरात प्रतिसाद#जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लवकरच होणार सन्मान..जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लवकरच होणार सन्मान..

चोपडा पालिका करवसुलीत जिल्ह्यात अव्वल
अभिनव उपक्रमाला शहरात प्रतिसाद#जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लवकरच होणार सन्मान..


जिल्ह्यातील २९ पालिका व नगरपंचायतीमधून चोपडा पालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी कराच्या वसुलीत पहिला क्रमांक पटकावला आहे. ९५.७५ टक्के वसूल करून चोपडा पालिका जिल्ह्यात प्रथम आली. पालिकेने ‘नगपालिका आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविल्याने चांगला प्रतिसाद यास मिळाला, त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांसोबत शहरातील नागरिक व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पालिकेचा सत्कार होणार आहे.


शहरातील नागरिकांसाठी पाणीपट्टी व घरपट्टी कर वेळेत भरावा यासाठी पालिका प्रशासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला होता. यात प्रामुख्याने ‘नगरपालिका आपल्या दारी’ या उपक्रमात कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना कराचे महत्त्व पटवून सांगितले. शहरातील विविध प्रभागांमध्ये जनजागृती केली. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. अनेक नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पालिकेने चांगली वसुली केली आहे. मागील वर्षी केवळ ७१.२९ टक्के वसुली झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More