चोपडा (प्रतिनिधी) दि. 3 एप्रिल 2026 ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा यांच्या मिळालेल्या पत्रानुसार मौजे वैजापूर ता. चोपडा मार्ग अनुदानित यूरिया व इतर अनुदानित रासायनिक खते अनधिकृत पणे वाहतूक करून शेजारच्या राज्यात तस्करी केली जाणार असल्याची खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार दि. 3/5/26रोजी चोपडा ग्रामीण पोलीसांचे मदतीने सीमावर्ती वैजापूर गावात बिना नंबर चा ट्रॉली सह खतानी भरलेला ट्रॅक्टर पकडला आहे .
सदर बाबतीत तपासणी केली असता सदर अनुदानित खत चोपडा येथील माऊली ट्रेडर्स या खत विक्री केंद्रातुन भरून अधिकृत पक्क्या बिलाशिवाय विक्री केल्याचे आडळून आले आहेत त्यामुळे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पथकाने केलेल्या कारवाईत युरिया 75 बॅग रू.= 19950 एस. एस. पी 20बॅग रू 13000 डी ए पी 5बॅग 6750 20:20:0:13 – 9 बॅग 21150 नॅनो यूरिया 8 बॉटल रू 1800 ट्रॅक्टर ट्रॅली सह 580000/- एकूण किंमत:633650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विवेक राजाराम पाटील मु.पो.चोपडा ता.चोपडा जि.जळगाव माऊली ट्रेडर्स चे संचालक सरद सीताराम पीपलदे रा. सातपाटी ता. भगवान पुरा जि. खरगोन यांच्यावर विनाश खैरनार यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे खत नियंत्रण आदेश 1985,आत्यावशक वस्तू कायदा 1955,भारतीय न्याय संहिता 2023 The Fertilizer (Movement Control )Order 1973 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली:सुनील बोरकर संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग,प्रविण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, महाराष्ट्र राज्य, कुरबान तडवी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव,पद्मनाथ मस्के,कृषी विकास अधिकारी, जि.प. जळगाव.उल्हास ठाकुर तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण), नाशीक यांनी केली












