चोपडा तालुक्यात जनगणनेस सुरुवात- चोपडा तालुक्यातील सर्व गावांमध्ये आजपासून घर यादी व घरगणना या पहिल्या टप्प्यास प्रारंभ

चोपडा तालुक्यातील सर्व गावांमध्ये आजपासून घर यादी व घरगणना या पहिल्या टप्प्यास प्रारंभ करण्यात आला आहे.सदर कामी 60 पर्यवेक्षक व 362 प्रगनक यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांना तीन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.डिजिटल पद्धतीने मोबाईल फोनचा वापर करून घरांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

सर्व नियुक्त अधिकारी यांना दिनांक 15 रोजी साहित्याची किट वाटप करण्यात आले असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, तहसील कार्यालयात जनगणना कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे.जनगणना ही लोकशाहीची पायाभरणी असून तिचे महत्व भारताच्या संविधानात अधोरेखित करण्यात आले आहे त्यामुळे या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पर्यवेक्षक व प्रकरणात यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

या टप्प्यामध्ये सर्व गावातील सर्व प्रभाग सर्व वस्ती, वाड्या, तांडे यामध्ये गृहभेटी करण्यात घरातील व्यक्ती, इमारत तसेच कौटुंबिक माहिती मोबाईल द्वारे सर्वरला पाठवली जाणार आहे.दिनांक 1 ते 15 मे दरम्यान ज्यांनी स्वगणना केली आहे त्यांच्याकडून 11 अंकी आयडी क्रमांक घेऊन जनगणना पूर्ण केली जाणार आहे, ज्यांनी स्वगणना केली नाही किंवा ज्यांना करता आली नाही त्यांची संपूर्ण माहिती 1 ते 33 प्रश्न विचारून प्रगनकांकडून नोंदविली जाणार आहे.

ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून नागरिकांकडून कोणत्याही कागदपत्राची मागणी पडताळणीसाठी किंवा निरीक्षणासाठी करण्यात येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता योग्य व बरोबर माहिती द्यावी असेही आवाहन करण्यात येत आहे.घर यादी व घर गणगणना या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार सर्वसाधारणपणे 200 कुटुंबांना एक प्रगणक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सहा प्रगनक यांच्या पर्यवेक्षणासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे…

भारतामध्ये जनगणना 1872 पासून करण्यात येत असून ही दशकातील नियमित जनगणना आहे, स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून ती संपूर्णपणे डिजिटल आहे डिजिटल जनगणनेमुळे सुलभता आणि पारदर्शकता वाढण्यास होणार आहे.जनगणनेच्या माहिती आधारे संपूर्ण देशाचे भविष्यकालीन नियोजन करण्यात येते, त्यामुळे सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे आणि जनगणना यशस्वी करावी यासाठी आवाहन करण्यात येते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More