चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहरातील उच्चभ्रू वस्तीत बडगुजर पेट्रोल पंपा समोर एका इमारतीत येथे देह विक्री करणाऱ्या महिलांना भाडे तत्वावर जागा देऊन त्याच्याकडून देहविक्री करून घेणाऱ्या 2 महिला व 9 पुरुष दलालांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

चोपडा शहरातील बडगुजर पेट्रोल पंपा समोर असलेले एका इमारतीत येथे देहविक्री करणाऱ्या महिलांना सुरेंद्र राजपूत नामक व्यक्ती ने भाडे तत्वावर देह विक्री करणाऱ्या महिलांना त्यांच्या खासगी इमारतीत भाडे तत्वावर रूम उपलब्ध करुन शिवाजी भिमराव पाटील, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव फरीद कदीर शेख, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव शाहरुख वाहीद खान, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव शरिफ रमजान तेली, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव कालु उर्फ रंजित चौधरी, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव फिरोजी ईसा खान, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव बापु उर्फ जितेंद्र रावण वाडे, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव सुरेंद्र राजपुत रा. चोपडा जिल्हा जळगाव व त्याचा सोबत असलेल्या दोन महिला आरोपी यांनी चोपडा शहरातील तहसील कार्यालयचा मागील बाजूस सुरु असलेल्या वेश्या वस्तीत 06 पिडीत महीलांकडुन स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवुन आश्रय देवुन वैश्याव्यवसाय करवुन घेताना आढळुन आले म्हणुन श्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 (PITA) च्या कलम 3, 4, 5, 7 व भारतीय न्याय संहीता कलम 143 प्रमाणे चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले करत आहे.

 

गुन्हेगारी रोखण्या करता मागील 25 वर्ष पासून सुरु असलेले वेश्या वस्ती भुईसपाट केली पोलीस निरीक्षक पवन देसले

मागील काही वर्षात खाजगी जागेवर अतिक्रमण करुन वेश्या व्यवसाय करणाऱ्यानी अनधिकृत वस्ती तयार करुनघेतली होती वेश्या वस्तीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याकारणाने एक दिवस अगोदर करण्यात आलेल्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी दोन जेसीबी सोबत घेऊन वेश्या वस्ती भुई सपाट करण्यात आली असल्याचे माहिती चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More