पोक्सो व अत्याचार प्रकरणातील आरोपी सलमान खान अख्तर खान यास ०५ वर्ष सक्तमजुरी # चोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पोक्सो व अत्याचार प्रकरणातील आरोपी सलमान खान अख्तर खान यास ०५ वर्ष सक्तमजुरी # चोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

चोपडा : चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो व अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी सलमान खान अख्तर खान (वय २८ वर्षे, रा. हमीद नगर, चोपडा) यास ०५ वर्ष सक्तमजुरी व ५,५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. ही शिक्षा अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. प्रकरणाचा तपास व न्यायालयीन पाठपुरावा प्रभावीपणे केल्याने चोपडा शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी भक्कम पुरावे व साक्षी न्यायालयासमोर सादर केल्या. त्यानंतर न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश -1माननीय श्रीमती सी व्ही पाटील मॅडम जिल्हा न्यायाधीश – व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमळनेर यांनी, आरोपीला दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान साक्षीदारांची उपस्थिती आणि प्रभावी पुरावे सादर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या निकालामुळे अशा गुन्हेगारांना कठोर संदेश मिळाला असून बालकांच्या सुरक्षेबाबत समाजाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More