शालीमार एक्स्प्रेसने प्रवास करताना चोपड्यातील २० वर्षीय तरुण बेपत्ता;लघवीसाठी उतरला अन् परतलाच नाही; शोध घेण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

शालीमार एक्स्प्रेसने प्रवास करताना चोपड्यातील २० वर्षीय तरुण बेपत्ता;लघवीसाठी उतरला अन् परतलाच नाही; शोध घेण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र9 न्युज नेटवर्क ​चोपडा (प्रतिनिधी):

चोपडा शहरातील शारदानगर येथील रहिवासी असलेला अर्जुन रवींद्रकुमार पाटील (वय २०) हा तरुण रेल्वे प्रवासादरम्यान अचानक बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी टाटा नगर रेल्वे पोलीस स्टेशन (घाटशिला, जि. जमशेदपूर, झारखंड) येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. 

​घटनेची सविस्तर माहिती:

तक्रारदार रवींद्रकुमार भिमराव पाटील (वय ५२, रा. घर नं. ४०, शारदानगर, चोपडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा अर्जुन हा २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३५ वाजेच्या सुमारास जळगाव येथून शालीमार एक्स्प्रेसने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान घाटशिला रेल्वे स्टेशन ते टाटा नगर रेल्वे स्टेशनदरम्यान “लघवी करून येतो” असे सांगून तो रेल्वेतून उतरला. मात्र, त्यानंतर तो परत रेल्वेत बसलाच नाही आणि निघून गेला. त्याचा शोध घेतला असता तो अद्याप आढळून आलेला नाही.

​याप्रकरणी टाटानगर रेल्वे पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं. कलम १३७(२) प्रमाणे (गुन्हा रजि.क्र. ८९/२०२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

​बेपत्ता तरुणाचे वर्णन:

​नाव: अर्जुन रवींद्रकुमार पाटील  वय: २० वर्षे  पत्ता: घर नं. ४०, शारदानगर, चोपडा, जि. जळगाव  शरीरयष्टी: मध्यम, उंची ५.५ फूट  रंग: गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, ओठ लहान, कान छोटे, डोळे मध्यम, डोळ्याला चष्मा लावलेला  अंगातील कपडे: काळ्या-पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा चेक्स शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट आणि पायात सँडल

​या वर्णनाचा तरुण कोणालाही दिसून आल्यास अथवा त्याबद्दल काही माहिती मिळाल्यास चोपडा शहर पोलीस स्टेशन किंवा टाटानगर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More