माझी वसुंधरा” अभियांनाअंतर्गत चोपडा नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली,शहरवासी यांनी जास्ती जास्त सायकलीचा वापर करावा. तसेच प्रत्येक सोमवार “ नो व्हेईकल डे ” म्हणून पाळावा.”-सौ.मनिषा जीवन चौधरी, नगराध्यक्षा

पृथ्वी, वायु, अग्नी, जल व आकाश पंचतत्वावर आधारीत “माझी वसुंधरा” अभियांनाअंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली मंगळवारी (दि.12/01/2021) घेणेत आली व अभियानाचा प्रचार करणेत आला. गटनेते जिवनभाऊ चौधरी, नगरसेवक डॉ.रविंद्र पाटील, गजेंद्र जैस्वाल, यांच्या उपस्थितीत जनजागृती फेरीला सुरुवात करणेत आली. नगरपरिषदेसह रोटरी क्लब ऑफ चोपडा, पंकज विद्यालय, कस्तुरबा विद्यालय, प्रताप विद्या मंदिर, महिला मंडळ विद्यालय व शहरातील नागरिक, लहान मुलांनी रॅलीत सहभाग नोंदविला. छ.शिवाजी महाराज चौक येथुन सायकल रॅलीचा प्रारंभ करणेत आला. मेनरोड, गोलमंदिर, आशा टॉकिज, भोकरवाडा पोलिस चौकी, रथ रस्ता, भाजी मार्केट, पाटील दरवाजा ते चोपडा नगरपरिषद कार्यालय आवारात रॅलीचा समारोप करणेत आला. तद्नंतर अंति.स्वच्छता पर्यवेक्षक प्रविण मराठे यांनी सुत्रसंचालन व हरित शपथचे वाचन केले. उपस्थित मान्यवर, नागरिकांनी हरित शपथ घेतली.

मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी प्रत्येक सोमवार “ नो व्हेईकल डे ” म्हणून पाळणेत येणार आहे असे घोषित केले. तसेच ई-बाईक/सायकल वापरणारे नागरिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “माझी वसुंधरा मित्र” म्हणून प्रशस्ती-पत्र देवून त्यांचा गौरव करणेत आला. अभियान यशस्वीतेसाठी स्वच्छता विभागाने नियोजन केले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष मनिषाताई चौधरी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, गटनेते जिवनभाऊ चौधरी, नगरसेवक डॉ.रविंद्र पाटील, गजेंद्र जैस्वाल उपमुख्याधिकारी पुनम राणे, पाणी पुरवठा अभियंता पल्लवी घिवंदे, लेखापाल संतोष पुणेकर, विद्युत अभियंता मंगेश जंगले, कर निरिक्षक रमेश बहिरम, अंतर्गत लेखापरिक्षक भिकन पारधी, नगरअभियंता सचिन गवांदे आदींसमवेत नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

**अविनाश गांगोडे, मुख्याधिकारी**

चोपडा शहर स्वच्छ व सुंदर ठेवणेसाठी परिसर स्वच्छ ठेवावा, वृक्षारोपण करावे व त्यांचे संवर्धन करावे. लोकसंख्यावाढीमुळे वाहनांचे प्रमाण वाढल्याने पर्यावरण प्रदुषणात वाढ होत आहे. त्यास आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रत्येक सोमवार “ नो व्हेईकल डे ” म्हणून पाळावा शक्य असेल त्याठिकाणी सायकल चालवावी, जास्तीत जास्त पायी चालावे त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होईल.”

  • “आरोग्यासाठी सायकल चालविणे उत्तम उपाय आहे. शहरवासी यांनी जास्ती जास्त सायकलीचा वापर करावा. तसेच प्रत्येक सोमवार “ नो व्हेईकल डे ” म्हणून पाळावा.”
    -सौ.मनिषा जीवन चौधरी, नगराध्यक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More