खान्देशातून चोपडा येथे प्रथमच फोस्टर्न मांजऱ्या (Boiga forsteni) सापाची नोंद

खान्देशातून चोपडा येथे प्रथमच फोस्टर्न मांजऱ्या (Boiga forsteni) सापाची नोंद

चोपडा शहरात भगिनी मंडळ चोपडा संचलीत, समाजकार्य महाविद्यालयात हा फोस्टर्न मांजऱ्या जातीचा साप आढळून आला,महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.ईश्वर एम सौंदाणकर यांनी तात्काळ भ्रमणध्वनी द्वारे चोपडा शहरातील सर्पमित्र संदीप मालचे, सागर मालचे, सागर बडगुजर यांच्याशी संपर्क केला असता सर्पमित्रांनी तात्काळ महाविद्यालयात पोहचून ३ - ४ फूट लांब फोस्टर्न मांजऱ्या सापाला शिताफीने पकडले. सदर सापाच्या अंगावर तपकीरी किंवा राखाडी रंगाच्या एकाआड एक चौकोनांची नक्षी किंवा आडवे पट्टे असतात तसेच डोक्यावर एक गडद काळी तसेच डोळ्यांमागे मानेपर्यंत एक काळी रेष असते. रुंद त्रिकोणी डोक्यापासून मान वेगळी दिसते मोठ्या डोळ्यात उभी बाहुली असते. छोटे पक्षी, उंदीर, पाल, सरडे हे ह्या सापाचे अन्न असून सदर साप निशाचर आहे. याचे एक वैशिष्ट म्हणजे हल्ला करताना फुत्कार टाकतो. झाडावर उत्तमप्रकारे चढतो. सदर साप पश्चिम घाटात सदर साप सर्वत्र आढळतो परंतु खान्देशात हि पहिलीच नोंद आहे. सदर सापाला लगेचच चोपडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले त्यावेळी सर्पमित्र संदीप मालचे, सागर मालचे, सागर बडगुजर तसेच वाहन चालक बुवा तडवी उपस्थित होते. घरात वा घराच्या परिसरात तसेच शेती शिवारात साप पाहून भीती वाटते,पण त्यांना त्रास दिला नाही व त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ दिले तर त्यांच्या कडून मानवाला कोणताही धोका नसतो.

दत्तात्रय लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा

फोस्टर्न मांजऱ्या साप आपल्या खान्देशात मिळणे वन्यजीव अभ्यासक,वन्यजीव प्रेमी आपण सर्वांसाठी आनंदाची बाब आहे तसेच आपला खान्देश हा जैवविविधतेने समृद्ध आहे याच हे उत्तम उदाहरण आहे.
संदीप मालचे, सर्पमित्र , चोपडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More