जिल्ह्यातील ‘या’आठ खाजगी रुग्णालयांना नोटीस
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेत करोनाबाधितांवर उपचार न करणे भोवले
जिल्ह्यातील ‘या’आठ खाजगी रुग्णालयांना नोटीस#त्यात चोपड्यातील नृसिंह हॉस्पिटल

जिल्ह्यातील ‘या’आठ खाजगी रुग्णालयांना नोटीस
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेत करोनाबाधितांवर उपचार न करणे भोवले
जिल्ह्यातील ‘या’आठ खाजगी रुग्णालयांना नोटीस#त्यात चोपड्यातील नृसिंह हॉस्पिटल

करोनाबाधित रुग्णांवर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत उपचार करण्याबाबतचा करार असतांनाही, योजनेत उपचार न करता कराराचा भंग करत बाधित रुग्णांवर प्रायव्हेटअंतर्गत उपचार करुन खर्च घेणार्‍या जिल्हयातील कोवीड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आलेल्या आठ रुग्णालयांना आज सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी नोटीस बजावली आहे.

यात पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, चोपडा येथील नृसिंह हॉस्पिटल, चाळीसगाव येथील बापजी जीवनदीप हॉस्पिटल व कृष्णा क्रिटीकर केअर, जामनेर येथील जी.एम. हॉस्पिटल, जळगाव येथील आश्‍विनी हॉस्पिटल, महाजन हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल या आठ रुग्णालयांचा समावेश आहे.

नोटीस मिळताच तीन दिवसात खुलासा सादर करावा तसेच पुढील आठवड्यात सुधारणा न दिसल्यास तसेच योजनेअंतर्गत कोवीड रुग्णांना मोफत उपचार न मिळाल्यास आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही नोटीसव्दारे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More