शहिद नानाभाऊ सैंदाणे स्मारकासमोर वृक्षारोपण

शहिद नानाभाऊ सैंदाणे स्मारकासमोर वृक्षारोपण


चोपडा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील
नालगवाडी,येथील माध्यमिक विद्यालय नागलवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वर्धा येथील आश्रमात लावलेल्या पिंपळच्या झाडा पासून तयार केलेली पिंपळाची रोपे महाराष्ट्रातील प्रत्येक शहीद स्मरकासमोर लावावीत असे महाराष्ट्र शासन व सामाजिक वनीकरण विभागाने ठरविले.महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती चे औचित्य साधुन सामाजिक वनीकरण यावल विभाग चोपडा मार्फत शहीद नानाभाऊ सैंदाणे स्मारक माध्यमिक विद्यालय नागलवाडी येथे चोपडे तालुक्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक काकासो श्री मोहनलाल छोटालाल गुजराथी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याच बरोबर खालील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले- श्री प्रकाश मोरणकर (IFS उपवनसंरक्षक यावल वनविभाग), श्री व्ही एच पवार (सहा वनक्षेत्रपाल चोपडा) श्री पी. बी. पाटील वनक्षेत्रपाल चोपडा, श्री समाधान सोनवणे वनक्षेत्रपाल वैजापूर, श्री विक्रम पदमोर वनक्षेत्रपाल यावल, श्री संजय साळुंखे वनक्षेत्रपाल कर्जाने, श्री अतुल जैनक वनक्षेत्रपाल देवझिरी, श्री दत्तात्र्य लोंढे सहा वनक्षेत्रपाल चोपडा, श्री बी.डी. कुंवर वनक्षेत्रपाल वैजापूर, माध्यमिक विद्यालय नागलवाडीचे मुख्याध्याक श्री ए.ए. ढबू सर, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
श्री प्रकाश मोरणकर साहेब यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक काकासो मोहनलाल गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर.बी.पाटील सर यांनी केले व कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभाग कर्मचारी,माध्यमिक विद्यालय नागलवाडीचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रा. पंचायत नागलवाडी चे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More