एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अभुतपूर्व निर्णय…..विद्यार्थ्यांना शिकविणार फक्त नाममात्र फि मध्ये….कोविड-19 च्या भयावह स्थितीमुळे घेतला योग्य निर्णय

एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुलचा अभुतपूर्व निर्णय…..विद्यार्थ्यांना शिकविणार फक्त नाममात्र फि मध्ये….कोविड-19 च्या भयावह स्थितीमुळे घेतला योग्य निर्णय

चोपडा दि.19 जुन – नूतन शिक्षण प्रसारक मंडळ,घोडगाव संचलित शेठ नटवरलाल रणछोडदास गुजराथी [SNRG] इंग्लिश मिडियम स्कूल,चोपडा यांचे शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे विचार करुन विद्यार्थी व पालकांना एक अनोखी भेट दिली.कोविड -19 च्या भयावह स्थितीतुन अद्यापपावेतो चोपडेकर सावरलेले नाहीत याची जाणिव मनात ठेवुन सर्व संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय नक्कीच प्रशंसनिय आहे.

एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक राजा मद्रासकर यांनी सद्यस्थितीत कोरोनामुळे पालकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती यामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात विशेष सवलत मिळावी असा प्रस्ताव अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांच्याकडे मांडला.सदर प्रस्तावास संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व संचालक मंडळाने त्वरित मंजूरी दिली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी व कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वार्षिक फी मध्ये विशेष सवलत दिली आहे.

शाळेच्या  २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप,नर्सरी,ज्युनियर केजी,सिनियर केजी या वर्गांची वार्षिक फी फक्त रु. ५०० + पुस्तक संच किंमत व इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांची वार्षिक फी फक्त रु. ५००० + पुस्तक संच किंमत घ्यावी असा निर्णय  संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व संचालक मंडळांनी घेतला आहे.सर्व पालकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक राजा मद्रासकर यांनी केले आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More