खिर्डी येथील शेतकऱ्याने पैसे मागितल्याचा व्यापाऱ्याला राग आल्यावर शेतकऱ्याला मारहाण,व्यापाऱ्यावर निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

खिर्डी येथील शेतकऱ्याने पैसे मागितल्याचा व्यापाऱ्याला राग आल्यावर शेतकऱ्याला मारहाण,व्यापाऱ्यावर निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

रावेर.( प्रतिनिधी.)

निंभोरा बु.येथून जवळच असलेल्या खिर्डी बु . येथील शेतकरी केतन शांताराम भंगाळे यांचे व्यापारी ईस्राईल सुलेमान पिंजारी यांच्याकडे असलेल्या कापसाचे वर्षभरापासून पैशांची मागणी केली मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून व्यापारी ईस्त्राईल पिंजारी टाळाटाळ करीत असून त्याच्याकडे या तरुण शेतकऱ्यांनी पैशांची मागणी केली असता व्यापाऱ्यासोबत असलेल्या इस्माईल सुलेमान पिंजारी याने केतन शांताराम भंगाळे या शेतकऱ्यास मारहाण केली.

त्या संदर्भातील तक्रार केतन शांताराम भंगाळे यांनी निंभोरा पोलिसांत केतन भंगाळे यांनी तक्रार दाखल केल्यावर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी सदर व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात भेट दिली.या संबंधी उद्या अनेक शेतकरी तक्रार देणार असल्याचे समजते.दरम्यान खुद्द व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल खरेदी करीत फसवणूक करीत पैसे देण्यास टाळाटाळ करून वर दमदाटी व शेतकऱ्यास मारहाण केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर संशयीत आरोपीस अटक करून निंभोरा पोलिसांत आणण्यात आले होते.याबाबत तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. योगेश शिंदे,ए .एस .आय .अनवर तडवी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More