चोपडा तालुक्यातील ऊसावरील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे चे कारखाना व कृषी विभाग यांना शेतकरी कृती समितीचे आवाहन….
चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यातील साऱ्याच भागात गेल्या काही वर्षापासून पांढरी माशीचा प्रचंड अटॅक हा येत असतो.परंतु क्रायसोफरला या मित्र कीड च्या अंडी चा वापर कारखाना व शेतकरी करायचे आणि त्यात एखादा जोराचा पाऊस यामुळे ते आटोक्यात येत होते .


यावर्षी चोपडा तालुक्यात जोराचा पाऊस झालेला नाही,फक्त शेतकरी क्रायसोफरला वापरून प्रयत्न करत आहेत, परंतु तरीही ती कीड आटोक्यात न आल्याने चोपडा तालुक्यात ऊसाचे उत्पादन प्रचंड कमी होईल व काहीना तर काढून फेकून द्यावा लागेल अशी अवस्था आहे.


शेतकरी आता आर्थिक थकलेत त्यासाठी कृषीविभाग,कृषी विज्ञान केंद्र व बारामती ऍग्रो( साखर कारखाना) यांच्या मदतीने औषधे व फवारणी होनसाठी औषधी अनुदान व फवारणीची मदत मिळण्याची शेतकऱ्यांना गरज आहे. त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजितजी राऊत, जिल्हा कृषी अधिकारी श्री संभाजीजी ठाकूर,कृषी उपसंचालक श्री अनिलजी भोकरे, तालुका कृषी अधिकारी साळुंखे,कृषी विज्ञान केंद्र, पाल चे संशोधक महाजन,तसेच बारामती ऍग्रो साखर कारखान्याचे श्री सुभाषजी गुळवे,कार्यकारी संचालक देशमुख,शेतकी अधिकारी देसले, अकबर पिंजारी या साऱ्यांशी शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी बोलत आहेत. संदर्भात लवकर कार्यवाही झाल्यास कीद आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल,त्यासाठी चे निवेदन तहसीलदार श्री अनिलजी गावीत यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री माळी यांचे कडे शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील,शशिकांत देवरे,प्रा प्रदीप पाटील, कुलदीप पाटील,अजित पाटील, सी एस पाटील यांनी दिले.














