परभणी जिल्ह्यातील बलात्कार पीडित चीमुरडीला न्याय मिळण्याबाबत चोपडा नाभिक समाजाचा वतीने तहसीलदारांना निवेदन…

परभणी जिल्ह्यातील बलात्कार पीडित चीमुरडीला न्याय मिळण्याबाबत चोपडा नाभिक समाजाचा वतीने तहसीलदारांना निवेदन…



चोपडा तालुक्यातील सकल नाभिक समाजाच्या वतीने आम्ही आपणास कळवू इच्छितो की, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये सेलू या गावी माणुसकीला काळीमा फासणारे क्रूर कृत्य घडले आहे. नाभिक कुटुंबातील एका 11 वर्षाच्या चिमुरडीवर सेलू गावातील अंगद घुले आणि तुकाराम घुले या दोन नराधमांनी पाशवी बलात्कार केला आहे. जिंतूर पोलिसांनी दोन्ही नराधमाना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.



घडलेल्या क्रूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजात व इतर समाजातही संपूर्ण परभणीसह जिल्ह्यासहीत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुरडीला आणि कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सर्व नाभिक समाजाच्या तीने या घटनेचा निषेध म्हणून आपला सलुन व्यवसाय आज बंद ठेवून निषेध व्यक्त केला.


यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम,जिल्हा सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, तालुकाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, उपाध्यक्ष अनिल पवार, हिरालाल सोनवणे, सचिव राजेंद्र येशी, शहराध्यक्ष सोपान बाविस्कर, उपाध्यक्ष शत्रुघ्न सोनवणे, सचिव विलास निकम, मनोहर सोनगिरे, राजेंद्र सोनगिरे, बापु पवार, भिकाजी ठाकरे, दिलीप शिरसाठ, निलेश निकम, राहुल निकम, योगेश सोनवणे, गोकुळ सोनवणे, किशोर सैंदाणे, रविंद्र जाधव, जिवा महाले संघटना अध्यक्ष देविदास बाविस्कर, उपाध्यक्ष धनराज पगारे, सचिव गणेश खोंडे, प्रमोद बाविस्कर, प्रदिप बाविस्कर, अनिल सैंदाणे, पंढरीनाथ शिरसाठ, भुषण जगताप, दिनेश जगताप, दत्तात्रय बाविस्कर आदिंसह समस्त नाभिक समाजबांधवांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More