पांढरी येथील १२ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या… आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात ?..

पांढरी येथील १२ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या… आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात ?..


चोपडा प्रतिनिधी :-
अडावद पोलिस स्टेशन हद्दीतील पांढरी गावातील १२ वर्षीय मुलगी दि.१९ पासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. आई – वडील व भावाने तिचा सर्वत्र शोध घेतला असता तिचा तपास लागत नव्हता. दि.२२ रोजी गावातील रियानीबाई नेराम बारेला हिने सदर मुलीच्या घरी येऊन तुमच्या मुलीने शेतातील नाल्यालगत असलेल्या झाडाला ओढणीने गळफास घेतले असल्याचे सांगितले.


सदर बाबीची खात्री करण्यासाठी मयत मुलीचे वडील शरद सुतार बारेला , जयराम पावरा , देवा बारेला, कुवरसिंग बारेला घटनास्थळी पोहोचले असता त्यांना सदर मुलीने आपल्याच ओढणीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले.


सदर घटनेची माहिती फोन करून अडावद पोलिस स्टेशनला कळविल्याने अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पंचनाम केला.
सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.


१२ वर्षीय लहान मुलीने आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न जनमाणसात चर्चिला जात आहे तसेच मुलीने कोणतेही कारण न सांगता घराबाहेर गेलीच कशी असाही प्रश्न उपस्थित होत आहे व चार दिवसानंतर तिच्या मृतदेह तिच्याच ओढणीने गळफास लावल्याचे प्रत्यक्ष दर्शनी पाहिले असून तसा पंचनामा करण्यात आला आहे. तर नेमके आत्महत्याचे कारण काय ? हे अजूनही गुलदस्तातच आहे .पोलीस तपासात सर्व बाबी निष्पन्न होतील अशी चर्चा परिसरात होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More