चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अब्दुल सत्तारांचा निषेध; गुन्हा दाखल व्हावा ही निवेदनाद्वारे मागणी

चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अब्दुल सत्तारांचा निषेध; गुन्हा दाखल व्हावा ही निवेदनाद्वारे मागणी


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करुन टिका टिपण्णी केली. या अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करावा व मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


सदर निवेदन प्रशासनातर्फे नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी स्विकारले.यावेळी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, जेडीसीसी संचालक घनश्याम अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील, इंदिराताई पाटील, माजी सभापती कल्पना दिनेश पाटील, माजी चोसाका चेअरमन अॕड. घनश्याम पाटील, चंद्रहासभाई गुजराथी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, माजी कृऊबा सभापती गिरीष पाटील, उद्योगपती सुनिल जैन, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, गोकुळ पाटील, मणिलाल पाटील, भरत पाटील, दिगंबर पाटील, भरत इंगळे, नंदकिशोर पाटील, रामचंद्र भादले, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, दिनेश पाटील, सुर्यकांत खैरनार, युवक तालुका उपाध्यक्ष नईम शेख, जमिल कुरेशी, रविंद्र पाटील आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More