मराठी सिनेमा वऱ्हाडी – वाजंत्री प्रीमियम शो चे चोपडेकरांना खास आमंत्रण…

मराठी सिनेमा वऱ्हाडी – वाजंत्री प्रीमियम शो चे
चोपडेकरांना खास आमंत्रण


महाराष्ट्र9न्यूज चोपडा ( प्रतिनिधी ) –

नामवंत नाट्य कलाकार तथा मराठी सिनेसृष्टी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटकर दिगदर्शित ‘ वऱ्हाडी वाजंत्री ‘ हा मराठमोळा सिनेमा प्रदर्शित झालाय,हा सिनेमा अप्रतिम असणारच आहे याबाबत शंका नसावी पण त्याहूनही आनंदाची अन अभिमानाची बाब म्हणजे सदर सिनेमाच्या प्रीमिअर शो साठी खुद्द दिग्दर्शक विजय पाटकर यांनी स्वतः चोपडा येथील पंकज पाटील,गुंजन एजन्सीचे संचालक राजेंद्र पाटील यांना आमंत्रित केलं.


चोपड्याचे पंकज पाटील यांनी आपला काही शैक्षणिक काळ मुंबईत घालवला त्याकाळात थेटर कलावंत विजय पाटकर यांच्याशी त्यांची ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले माणूस मोठा झाला की,मित्रांना,नातलगांना विसरतो हे सत्य आहे,पण याला अपवाद आपले मराठी कलाकार विजय पाटकर असावेत,बहुदा ते मराठी आहेत म्हणूनच.त्यांनी मैत्री जपली आणि आपल्या सिनेमाच्या प्रीमिअर शो साठी आग्रहाचे निमंत्रण पाठवले,ते आमच्या चोपडा तालुक्यातील पंकज पाटील, गुंजन एजन्सीचे संचालक राजेंद्र पाटील यांना. बरं ही मंडळी एकटी गेली नाही तर सोबत डी. व्ही.चौधरी,सामाजिक कार्यकर्ते शाहरुख शे. नजीर यांनाही समवेत घेतले.आपली माणसं मोठी झाली पाहिजेत हाच त्यामागचा उद्देश.
विजय पाटकर दिग्दर्शित ‘ वऱ्हाडी वाजंत्री ‘ या सिनेमात अनेक नामवंत स्टार कास्टिंग आहे.


आपल्या प्रिया बेर्डे,हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे
असे अनेक नामचीन कलावंत आहेत या सर्वांनी आपल्या चोपड्याला,चोपड्यातील माणसाला भरभरून मान सन्मान दिला त्याबद्दल मराठी चित्रपट सृष्टीचे आभार आणि गुंजन एजन्सीचे संचालक राजेंद्र पाटील,पंकज पाटील यांचेही मनःपूर्वक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More