आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते वनपट्टेधारक आदिवासींना ७/१२ उताऱ्यांचे वाटप…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
चोपड्याच्या आमदार सौ लताताई सोनवणे यांचे हस्ते ६८१ वनपट्टे धारक आदिवासी यांना ७/१२ उतारे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार अनिल गावित, संजीव शिरसाठ आदिवासी सेवक ,देवेंद्र नेतकर पुरवठा अधिकारी ,सौ शितल देवराज सरपंच, बुधा बारेला ,प्रताप पावरा सरपंच मेलाणे,दत्तरसिंग पावरा सरपंच वैजापुर, प्रल्हाद पाडवी सरपंच देव्हारी,दिलिप पावरा उपसरपंच मेलाणे,सुकलाल कोळी,अनिल पावरा,नामसिंग पावरा, ताराचंद पाडवी, विजय कचवे ,मयुर बारेला,बबलु बारेला,नका बारेला,ईदा बारेला,बियाणु बारेला, गंगाराम बारेला,लकडा बारेला आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान सोनवणे वनक्षेत्रपाल यांनी केले. तर सूत्रसंचालन संजीव शिरसाठ यांनी केले.आभार दत्तरसिंग पावरा यांनी मानले.














