चोपड़ा येथे डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 135 रक्तदात्यांचे रक्तदान..

चोपड़ा येथे डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 135 रक्तदात्यांचे रक्तदान.

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


नववर्षाच्या प्रारंभी वंदे मातरम ग्रुप,यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट,डॉ. राहुल पाटील मित्र परिवार व हेल्थ इज वेल्थ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01/01/2023 रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिर,रक्तगट तपासणी व देहदान-अवयव दान शिबिराचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.रक्तदान शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन चोपडाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र जयस्वाल व सचिव डॉ.मंगेश वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच कार्यक्रमात देहदान दात्यांच्या सत्कार चोपडा बाजार समितीचे माजी सभापती श्री कांतीलाल पाटील व चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


देह दानासाठी गिताबाई गंगाधर चौधरी,सुमनबाई लक्ष्मण पाटील,संजय दगडू सूर्यवंशी,सुरेखा संजय सूर्यवंशी व गुलाबराव बाबुराव देशमुख यांचा देहदान सर्टिफिकेट प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री दीपक जैन यांचा त्यांचा रक्तादान क्षेत्रात असलेल्या भरीव कार्यबद्दल विशेष सत्कार आला तसेच रक्तदान शिबिरात 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले व रक्तसंचलन जळगाव येथील रेड प्लस रक्तपेढी,गोडवलकर रक्तपेढी व चोपडा येथील रेड क्रॉस सोसायटी यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदे मातरम ग्रुप चे अध्यक्ष श्री दिलीप पाटील सचिव विजय पाटील कांतीलाल पाटील,डॉ प्रशांत पाटील, डॉ एल टी पाटील, डॉ जे डी चव्हाण, डॉ निशांत सैय्यद,डॉ अनवर जुगलकिशोर पाटील,जितेंद्र पाटील,सुनील पाटील,भरत पाटील,अविनाश पाटील,शत्रुघ्न पाटील,भगवान पाटील,किरण पाटील,पंकज पाटील,विलास पाटील,गजानन पाटील, पाटील,दिनेश नाथबुवा,गौतम शिंदे,संतोष साळुंखे,नकुल पाटील,भुषण पाटील यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले व आभार दिलीप पाटील यांनी व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More