शहरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई,८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

शहरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई,८५ हजारांचा मुद्देमाल जप्त


चोपडा(प्रतिनिधी)
दि ६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून शहरातील रामपुरा भागातील शेख रशीद यांच्या घराजवळील बंदीस्त खोलीमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर शहर पोलिसांनी धाड टाकत नऊ जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून पंच्यांशी हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जमा करण्यात आला.
शहरातील रामपुरा भागात स्वतःच्या फायद्यासाठी मांग पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना शेख रशीद शेख इस्माईल(५०),गणेश खंडारे(28) रवींद्र माळी(38), मोसीम शेख बाबू(28),सौरभ पाटील(21) गजानन ससाणे(27),शिवाजी भोई(25) रा चोपडा याना घटनास्थळीहुन अटक करण्यात आली.यावेळी पोलिसांना रोख रकम ,मोबाईल,मोटारसायकल सह ८५ हजारांचा मुद्देमाल मिळून आला.सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्नील उगवणे,पोना प्रदीप राजपूत,विलेश सोनवणे, जयदीप राजपूत, पोकॉ निलेश लोहार,श्याम धनगर यांनी केली.दाखल फिर्यादीवरून सात जणांवर जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More