नाशिक पदवीधर निवडणूक:
विजयाची रॅली ‘मातोश्री’वर घेऊन जाणारच”; शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला विश्वास;
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी):-
महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. चोपडा येथील पंकज विद्यालयात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष सत्यजित तांबे यांच्यासाठी सोपी व एकतर्फी करण्याचे भाजपाचे दबावतंत्र फोल ठरले आहे. तांबे व महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. सहाजणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १६ उमेदवार आहेत.

शुभांगी पाटील यांना पत्रकारांना उमेदवारी संदर्भात विचारणा केली असता ,त्यांनी आपली उमेदवारी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे सांगितले व आपलाच विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने २० मतदार मतदान केंद्रावर नेण्याची जबाबदारी त्यांनी सोपवली असून, बहिणीला मतदान रुपी मदतीचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. मी चोपडेकरांना आधी शब्द दिला होता की, 20% अनुदान आणल्याशिवाय चोपडा शहरात येणार नाही आणि तो शब्द पूर्ण केल्यावरच मी चोपडा शहरात आली .आता यापुढे शब्द देते की, जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय मी चोपड्यात येणार नाही असा शब्द देऊन त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला….













