चोपडा येथे मध्यरात्री राहुल एम्पोरियम कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा होरपळून मृत्यू ..#उर्वरित ६ जण सुखरुप…

चोपडा येथे मध्यरात्री राहुल एम्पोरियम कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा होरपळून मृत्यू ..
उर्वरित ६ जण सुखरुप…


  महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


   चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास रात्री शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यु झाला आहे व उर्वरित ६ जणांना या भीषण आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.


   चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शहरातील मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री  च्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे समजताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ त्याठिकाणी दाखल झाले.

मात्र चोपडा नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणेला त्याठिकाणी पोहोचण्यास उशिर झाल्याचे समजते.चोपडा अग्निशमन दलातील  कर्मचारी दीपक बडगुजर यांनी तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चार जणांना सुखरूप बाहेर काढले . त्यात नगर पालिका कर्मचारी दिपक बडगुजर यांचा हात भाजला गेला आहे.चोपडा अग्निशमन दलाच्या गाड्यांना प्रेशर नसल्यामुळे तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहचत नसल्याने आग लवकर आटोक्यात आणली गेली नसल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे .चोपडा अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पोलीसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या.


तसेच अमळनेर येथील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवली असल्याचे नागरिकांनी सांगितले.अमळनेर येथील अग्निशमन पथक हे घटनास्थळी सव्वा तीन वाजता पोहचले असल्याची माहिती अग्निशामक प्रमुख नितीन खैरनार यांनी महाराष्ट्र9 न्यूजला दिली तसेच जळगाव नगर पालिकेला लेट कॉल मिळाल्यामुळे सकाळी साडेपाच वाजता घटनास्थळी पोचले असल्याची माहिती भरत बारी यांनी दिली
ते त्यानंतर तब्बल साडे चार तासांनी हि आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या भीषण आगीमुळे गौरव सुरेश राखेचा(जैन) वय २७ या तरुणाचा होरपळून मृत्यु झाला आहे व उर्वरित ६ जणांना आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.


   यावेळी शहर पोलीस स्टेशनचे  प्रभारी अजित सावळे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, पोना. मधुकर पवार, नितिन कापडणे, शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More