महाराष्ट्र टायर्स दुकानाला आग… दोन लाख रुपयांचे नुकसान…

महाराष्ट्र टायर्स दुकानाला आग… दोन लाख रुपयांचे नुकसान…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा शहरांतील महाराष्ट्र टायर्स या दुकानाला अचानक आग लागल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
सैय्यद मजहर सैय्यद जहागीर वय २८ वर्षे रा. चुनारअली यांचे टायर विक्रीचे दुकान आहे.


सकाळी ७ वाजेपूर्वी इलेक्ट्रीक शॉक शर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र टायर्स दुकानात इलेक्ट्रीक शॉक शर्किट होवुन 200000/- रु. किमतीचे नविन विक्री साठी ठेवलेले मोटार सायकलचे ट्युब व टायर तसेच चारचाकी वाहनाचे टायर मध्ये लावायचे रेडीयल पेज, ओमनी शोलेशन आगीत जळुन नुकसान झाले आहे.


कर्ज काढून नवीन माल विक्रीसाठी भरला होता. तोवर अचानक लागलेल्या आगीत सर्व नुकसान झाल्याने दुकान मालक चिंताग्रस्त झाला आहे. सदर नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी दुकान मालकाने केली आहे. सदर घटनेचा पंचनामा शहर तलाठी यांनी केला आहे.घटनास्थळी अग्नीशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली होती. सदर अग्नीशमन गाडीने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More