विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन युवकाचा खून! आरोपी अटकेत

विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन युवकाचा खून! आरोपी अटकेत


चोपडा तालुक्यातील विरवाडे या गांवी दि. ०२ मार्च २०२३ रोजी रात्री ९ वाजेदरम्यान किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या घरी जावून शिवीगाळ दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण करुन आरोपी सागर देविदास कोळी याने त्याचे जवळील चाकुने भोजु कोळी याचे मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजु कोळी यास जिवेठार मारुन त्याचा खुन केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मयत भोजु कोळी


याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 02/03/2023 रोजी रात्री 8.30 ते 9.00 वाजे दरम्यान विरवाडे गांवी सबस्टेशनजवळ तसेच फिर्यादीचे घरासमोरील अंगणात आरोपी नामे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी व शोभाबाई देविदास कोळी सर्व रा. विरवाडे यांनी संगनमत करुन आरोपी दिपक कोळी व फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याचे कारणावरुन आरोपी यांनी फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली.

व आरोपी सागर कोळी याने फिर्यादीचा मुलगा राजेंद्र कोळी याचे कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केली. नंतर सदर भांडणाचा मनात राग ठेवुन आरोपी सागर देविदास कोळी व शोभाबाई देविदास कोळी हे फिर्यादीचे घरासमोर अंगणात येवुन फिर्यादी तसेच फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी यास शिवीगाळ दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आरोपी सागर देविदास कोळी याने त्याच्याजवळील चाकुने फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी याच्या मानेजवळ, पाठीवर तसेच इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजु कोळी यास जिवेठार मारुन त्याचा खुन केला म्हणुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं. 95/2023 भादंवि कलम 302, 337, 323, 504, 506 व 34 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी यांना पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेवून अटक केली असुन आरोपी सागर कोळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेची माहिती कळताच तात्काळ चोपडा शहर पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणणेकामी विरवाडे गांवी व उपजिल्हा रुग्णालयात तगडा बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांनी विरवाडे गांवी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, शेषराव तोरे, पोना. संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, सुभाष सपकाळ, विलेश सोनवणे, जितेंद्र चव्हाण, मनोज साळुंखे, पोकाँ. शुभम पाटील, प्रकाश मथुरे, विजय बच्छाव व होमगार्ड आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात चोख बंदोबस्त ठेवला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More