मुलाच्या खून केल्या प्रकरणी आई व आते भावास जन्मठेप चहार्डीच्या खटल्यात अमळनेर सेशन कोर्टाचा निकाल

मुलाच्या खून केल्या प्रकरणी आई व आते भावास जन्मठेप चहार्डीच्या खटल्यात अमळनेर सेशन कोर्टाचा निकाल.

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी



अविवाहित भाच्याचे त्याच्या मामीशी अनैतिक संबंध होते. त्यांना याच मामीच्या मुलाने भर दुपारी पाहून घेतले होते. हे मी माझ्या वडीलांना सांगतोच आता, असे म्हणताच त्याच्या आईने त्याचा पाठलाग केला, मागून येवून मुलाच्या डोक्यात चारदा काठीने मारुन जखमी केले. दोघा आरोपींनी त्या मुलाचा तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यांत तो बेशुद्ध पडला. इकडे मंगेशचे वडील: दगडू लोटन पाटील यांच्या खबरीवरुन चोपडा शहर पोलीसांत आधी मिसिंग नंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाला सारखे वळण मिळत गेले. नंतर नरबळीचा तो प्रकार वाटला. त्या दिशेने तपासाची चक्रे फिरली. तो सोमवती अमावस्येचा दिवस होता. एव्हाना तो मुलगा मृत झालेला होता.ह्या दोघा आरोपींनी त्या मुलाला मध्यरात्री गाव शिवारात नेवून त्याचा १ पाय तोडला. त्याच्यावर कुंकू हळद शिपळले. नरबळीचे वळण देणारी दिशाभूल केली. मृतदेह सापडला नाही.

तत्कालीन ए पी आय मनोज पवार एच सी संदेश पाटील तपास करीत होते. आरोपी समाधानच्या सांगण्यावरून पोलीसांनी दगडी खदानीचे पाणी उपसले. स्लॅबचे १ घर खोदले तरीही डेडबॉडी सापडत नव्हती. २० दिवस होत आले तरी परफेक्ट तपास लागत नव्हता, नंतर हा तपास तत्कालीन ए एस पी सौरभ अग्रवाल यांनी हाती घेतला. फरिन्सिक रिपोर्ट आणि त्याच्या आईची डी एन ए चाचणी घेण्यात आली. त्यावरुन तो पाय मयत मंगेशचाच असल्याचे अनुमान निघाले.

आरोपींनी खून करुन, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली दोघा आरोपींना गजाआड करण्यात आले. तेंव्हापासून ते दोघे आरोपी सुटलेच नव्हते. अमळनेर सेशन कोर्टात या खटल्याचे कामकाज चालले. फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल, मंगरुळकर यांनी कोर्टात प्रभावी युक्तीवाद मांडले. एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. कोर्टात केस सिद्ध झाल्याने आरोपी आई गिताबाई दगडू पाटील व तिचा अविवाहित भाचा संभा उर्फ समाधान विलास पाटील ह्या दोघांना सत्र न्यायाधिश पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावणारा निकाल सुनावला आहे.,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More