चोपडा बाजार समितीत स्पष्ट बहुमतासाठी शिंदे सेना उंबरठ्यावर पण स्पष्ट बहुमत कोणालाच नाही …

चोपडा बाजार समितीत स्पष्ट बहुमतासाठी शिंदे सेना उंबरठ्यावर पण स्पष्ट बहुमत कोणालाच नाही …


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा तिरंगी लढतीत स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही.आज रोजी चोपडा बाजार समितीचा निकालात प्रा. अरूणभाई गुजराथी व भाजपाचा काही गट यांच्या सहकार पॅनलला फक्त ४ जागा , शिंदे गट व भारतीय जनता पक्ष यांच्या शेतकरी विकास पॅनलला ९ जागा तर राष्ट्रवादीचा नाराज गट यांच्या बळीराजा पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत .राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्या नंतर सुध्दा बहुमताचा आकडा पार करता आला नाही. अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी घोडे बाजार तर होणार नाही ना ?अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे .राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? याचावर अद्याप कोणी ही प्रतिक्रिया दिलेली नाही .

निकालाची वाट बघताना महिला उमेदवार


तर माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व भारतीय जनता पक्ष यांच्या शेतकरी विकास पॅनलला एका जागेसाठी झुंज द्यावी लागणार आहे. शेतकरी विकास पॅनलच्या कल्पना भरत पाटील ह्या दोन मतांनी विजयी झाल्या नंतर बळीराजा पॅनलच्या उज्वलाबाई सुनील पाटील यांनी फेर तपासणी मागणी केली असता फेर तपासणीत तीन मत वाढल्या मुळे कल्पना भरत पाटील यांना २५३ मते मिळाली असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले. उज्वला बाई यांना २५२ मते मिळाली होती .

विजयी उमेदवाराची नावे पुढील प्रमाणे आहे
# शेतकरी विकास पॅनल –
१) गोपाल श्रीराम पाटील (३६०)
२) वसंत पिरान पाटील (३१५)
३) शिवराज पाटील (३४८)
४) किरण रामलाल देवराज (३२१)
५) सनेर मनोज रामराव (२९६)
६) कल्पना भरत पाटील (२५२)
७) नरेंद्र वसंत पाटील(२५४)
८)विजय शालिकराव पाटील(२६१)
९)मिलिंद गणपतराव पाटील(२४६)
# बळीराजा पॅनल –
१) नंदकिशोर चिंधू सांगोरे (२८१)
२) सोनाली नारायण पाटील (२७३)
३)घनश्याम निंबाजी पाटील (३०५)
४)डॉ अनिल रामदास पाटील(२५७)
५) विनायक रामदास चव्हाण (२५५)
# राष्ट्रवादी भाजपा चे सहकार पॅनल –
१) सुनील तीलोकचंद जैन (१४१)
२) सुनील अग्रवाल (१४२)
३) नितीन शालिग्राम पाटील(८८)
३) नंदकिशोर भानुदास पाटील(२६१)
शिंदे गट व भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी ये तो अभी झाकी है, नगरपालिका बाकी है… अशा घोषणा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More