चोपडा तालुक्यातील वटार गावी गॅस हंडी च्या भीषण स्फोट आगीत तीन घरे जळून खाक दोन जण जखमी प्रचंड नुकसान…

वटार गावी गॅस हंडी च्या भीषण स्फोट आगीत तीन घरे जळून खाक दोन जण जखमी प्रचंड नुकसान

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी..

चोपडा दिनांक. 29 तालुक्यातील वटार गावी गॅस नळी लीग झाल्याने हंडीच्या स्फोट तर तीन घरे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन जण जखमी झाले असून संसाररोपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झाल्याने आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे.


सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही आगीचे वृत्त गावभर पसरताच गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले तसेच जळगाव व चोपडा येथून अग्निशामक दलाचे तीन गाड्या वटार येथे दाखल झाल्या असून रात्रीपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते घटनास्थळी नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी, पोलीस कर्मचारी, व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले आहेत जखमींना अडावद रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत हाती आलेले वृत्त असे की वटार येतील कैलास भिका कोळि यांच्या घरी रात्रीचं जेवण तयार करीत असताना गॅस नळीने अचानक पेट घेऊन गॅस हंडीच्या स्फोट झाला घरात आगीने रुद्र रूप धारण केले. त्यात कैलास कोळी व सौ सरला कोळि या जखमी झाल्या असून उपचारार्थ अडावद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान कैलास कोळी यांच्या घराला आग लागल्यानंतर धनसिंग खंडू कोळी,भिकुबाई सुभाष कोळी यांच्या घरांनाही आगीने घेरले असता सर्व काही जळून खाक झाले आहे.


आगीचे वृत्त परिसरात पोहोचताच वडगाव, सुटकार व वटार तिघेही गावातील लोकांनी आग वीझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.त्यानंतर चोपडा येथून दोन व जळगाव येथून एक अग्निशमन दाखल होऊन आग विझवण्याचे काम करीत होते. घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन भामडे, सर्कल व्हि डी पाटील, तलाठी महेंद्र पाटील, अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, व ईतर पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते शिवाय. जिल्हा पंचायत सदस्य शांताराम पाटील, राकेश पाटील, मंगल इंगडे, सचिन महाजन, सरपंच गोपाल ठाकरे, भाजप सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More