अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अविनाश धनगर १५ वर्ष कारावास

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अविनाश धनगर १५ वर्ष कारावास


चोपडा
शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी अल्पवयीन 17 वर्षे वयाच्या मुलीस भावेर तालुका शिरपूर येथील आरोपी अविनाश सुरेश धनगर (वय 22) याने अपहरण करून तिला रोहिणी भोईटी, मानपुर, सुंदरेल, ओंकारेश्वर या ठिकाणी घेऊन जाऊन सदर पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला होता.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे,पोहेका प्रदीप राजपूत,


याबाबत मुलीचे पालकांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 363, 376 (एक) (दोन) एन ३६६ (अ )सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,5, एल 12 प्रमाणे दिनांक 16. 12. 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची तपासामध्ये तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून पीडित मुलगी व आरोपी यांना ओंकारेश्वर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपी अविनाश धनगर यास हा गुन्हा दाखल असल्याने अटक केली व नंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांनी गुन्ह्यामध्ये पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे जाऊन कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी अविनाश धनगर विरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायालय अमळनेर येथे दोषारोप पत्र दाखल केले होते.

सदर गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश अमळनेर येथील पी.आर.चौधरी यांच्या न्यायालयात करण्यात आली. सदर गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होऊन दिनांक 6. 11. 2023 रोजी सदर खटल्यात आरोपी अविनाश सुरेश धनगर वय 22 राहणार भावेर तालुका शिरपूर याची विरुद्ध कलम 363 अन्वये पाच वर्षे तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 चे 4/12 मध्ये दहा वर्षे अशी एकूण पंधरा वर्षे सश्रम कारावासाचे शिक्षा ठोठावण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोहेका प्रदीप राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केला खटल्याचे कामकाज सरकारतर्फे वकील राजेंद्र चौधरी यांनी पाहिले व भैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे यांनी कामकाज केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More