मंगरूळ गावातील विकास कामासाठी ग्रामस्थांचे आमदारांना निवेदन # निकृष्ट कामांची चौकशी करून कारवाई करणार आमदार सौ लताताई सोनवणे..

मंगरूळ गावातील विकास कामासाठी ग्रामस्थांचे आमदारांना निवेदन

निकृष्ट कामांची चौकशी करून कारवाई करणार आमदार सौ लताताई सोनवणे

चोपडा तालुक्यातील मंगरूळ ते मंगरूळ फाटा हा रस्ता सुमारे ११/१२वर्षापासुन हा रस्ता झालाच नव्हता तो आता खऱ्या अर्थाने मुहर्त स्वरुपात येत आहेत अशी आशा बाळगु या उगाच श्रेय घेण्याच्या नादात होणार काम बंद पडल होत त्यामुळे संपुर्ण मंगरूळ गाव वेठीस धरल जात होत गावात येणारी बस हि बंद झाली होती त्यामुळे गावातील आमची लहान मुल मुली शाळा कॉलेजचे विद्यार्थी/विद्यार्थीनि यांचे प्रचंड हाल होत होते गावातील जेष्ट श्रेष्ट मंडळी गावातील प्रत्येक नागरीक येणारे पाव्हणे रावणे यांचे बोलणे/टोमणे सतत कानावर पडत होते हा प्रत्येक गावकऱ्यांचा अनुभव होता. गावातील रस्त्याचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी  लागावा ह्या करता आमदार सौ लताताई सोनवणे,माजी आमदार अण्णासो  चंद्रकांतजी सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना मंगरुऴ ग्रामस्थ.. माजी ग्रां. पं. सदस्य.. रविंद्र निकम, ग्रा. पं. सदस्य. विवेकानंद कोळी, समाधान धनगर, रुपसिंग पाटील, विनायक पाटील., ग्रा. पं. सदस्य लतीफ तडवी उपस्थित होते .


आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना मंगरूळ फाटा ते मंगरूळ गाव रस्त्याचा कामा संधर्भात मिळालेल्या निवेदन संदर्भात आमदार लताताई सोनवणे यांनी  येत्या आठवड्याभरात पुन्हा  मंगरूळ रस्त्याचे काम चालू होईल असे आश्वासन दिले व त्यासोबत जलजीवन मिशन अंतर्गत जलजीवन योजनेसाठी 59 लाखाचा जो निधी आलेला होता त्याचे जे काही काम सुरू होते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते त्याविषयी सविस्तर चर्चा आमदारांन सोबत चर्चा करण्यात आली व त्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी या करता  सुद्धा निवेदन देण्यात आले व तसे सर्व फोटो व छायाचित्रण व्हिडिओ सहित आमदार सोनवणे यांना दाखवण्यात आलेले आहेत लवकरच संबंधित कॉन्ट्रॅक्टर वरती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे
गावाच्या विकास कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा श्रेयवाद आनुन विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More