भारत डाळ योजने अंतर्गत गायत्री ट्रेडिंग चा माध्यमातून चोपडा येथे हरबरा डाळ माफक दरात उपलब्ध..

६० रू किलो हरभरा डाळ विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद
चोपडा

भारत डाळ योजने अंतर्गत गायत्री ट्रेडिंग चा माध्यमातून चोपडा येथे हरबरा डाळ माफक दरात उपलब्ध


येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढलेल्या महागाई थोपविण्यासाठी केंद्र शासनाने सर्वसामान्यांसाठी प्रति किलो ६० रू दराने हरभरा डाळ विक्रीस प्रारंभ करण्यात आला. दिनांक १९ रोजी सकाळी स्टॉल्स लावून गायत्री ट्रेडर्स तर्फे ही डाळ विक्री करण्यात आली. विक्रीचा स्टॉल्स सुरू झाल्यानंतर एक ते दीड तासाच्या आतच जवळपास ७० किलो डाळ विक्री करण्यात आली. भारत डाळ योजने अंतर्गत ही डाळ विक्री करण्यात आली.डाळ घेण्यास येणाऱ्यास आधार कार्ड वरील नंबर सांगणे आवश्यक असल्याने ज्या ग्राहकाला आधार कार्ड नंबर सांगता येईल त्यांनाच डाळ दिली जात आहे.

अन्यथा आधार कार्ड सोबत घेवून जाणे आवश्यक आहे. गायत्री ट्रेडर्स मार्फत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे ही भारत चना डाळ याजने अंतर्गत विक्री सुरू आहे.चना डाळ विक्री स्टॉल्स वर लावण्यात आलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि जिल्ह्यातील तीनही मंत्री गिरीश महाजन,गुलाबराव पाटील,अनिल पाटील आणि आमदार लताताई सोनवणे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या केंद्रावर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्फत ही विक्री सुरू झाली आहे.यामुळे खुल्या बाजारात चना डाळ ७५ रू प्रति किलो दराने विक्री करण्यात येत आहे.मात्र या केंद्रावर महागाई स चाप बसवा म्हणून ६० रू प्रति किलो दराने विक्री करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More