अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कापूससह साऱ्याच पिकांचा पंचनामा न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन….

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कापूससह साऱ्याच पिकांचा पंचनामा न झाल्यास शेतकरी करणार आंदोलन….

चोपडा तालुक्यात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येते तेव्हा तेव्हा शासन सुलतानी आदेश काढते व शेतकऱ्यांना मदती पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.कापूस लागवडीचे आदेशानेच जून मध्ये शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली,तरी देखील बोंड अळी पडली,शासन गप्प,फक्त २१दिवस सलग खंड नाही म्हणून पीकविमा चे ट्रिगर लागू नाही.


कापूस उशिरा पेरणी केल्याने आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस शेतात उभा असून अवकाळीने तो खराब झाला.पीक विमा कंपन्या कडे फोन केले असता पोस्ट हार्वेस्टिंग चे नावाने ते तक्रार घेत नाहीत,अतिवृष्टी नसल्याने सरकार पंचनामा टाळत आहे,अवकाळी त अतिवृष्टी चा काय संबंध?आता शेतकऱ्यांनी कुठे जावे?जिल्ह्यात वजनदार तीन तीन मंत्री ,त्यात मदत व पुनर्वसन मंत्री तरी शेतकऱ्यांचा पंचनामा होत नसेल तर मदत कशी मिळेल.त्याच्या नुकसानीचा पंचनामा होऊन त्याला मदत मिळणे गरजेचे आहे.

तो न झाल्यास शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.शासनाच्या वतीने शिंपी यांनी निवेदन स्वीकारले त्यावर एस बी पाटील,डॉ रवींद्र निकम,पांडुरंग पाटील,धीरज पाटील,कुलदीप पाटील,कमलाकर पाटील,प्रमोद बोरसे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More