५५वर्षीय नरधामा कडून सात वर्षीय बालिकेचा विनयभंग चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
चोपडा तालुक्यातील एका गावात आरोपी अशोक देवराम पाटील वय ५५ या नारा धामाने दि .१०/१२/२०२३ रोजी रात्री ९ वाजेचा सुमारास ७ वर्षीय बालिकेला टीव्ही बघण्याचा आमिष दाखवत घरात घेऊन जाऊन लैंगिक इच्छेच्या उद्देशाने अश्लिल चाळे केल्या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादीचे वडील यांचा फिर्यादी वरून भादवी कलम ३५४, ३५४(अ), सह कलम बाल लॉगक अत्याचार कायदा कलम २०१२ चे कलम ८, १२, व अ.जा.ज.अ.प्र.का १९८९ सुधारित अधिनियम सन २००५ चा कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुनिल नंदवाळकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर अतिरिक्त कार्यभार चोपडा उपविभाग, यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक के, के पाटील चोपडा शहर पो स्टे सपोनि एस एल नितनवरे चोपडा ग्रामिण पो स्टे करत आहे














