गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे व्हावेत.चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी.

गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे व्हावेत.चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी.



चोपडा:-चोपडा तालुक्यात दिनांक 26रोजी झालेल्या अवकाळी गारपीट व पावसाने तालुक्यातील निंमगव्हाण,चुंचाळे,मामलदे,तांदळवाडी,डोंदवाडे,चहार्डी हातेड,संपुले व तालुक्यातील इतर भागात दिनांक 26रोजी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगटासह बेमोसमी पाऊस पडून शेतकरी वर्गाचे हाताशी आलेले पीक दादर, मका, हरभरा, बाजरी, गहू ह्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून द्यावा म्हणून चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने नायब तहसीलदार महाजन यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनावर जेडीसीसी बँकेचे संचालक घनश्यामभाई अग्रवाल,तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नारायणदादा पाटील माजी सभापती कृ.उ. बा.चोपडा कसबे चे चेअरमन प्रविणभाई गुजराथी,सोनालीताई नारायण पाटील महीला जिल्हाध्यक्ष रावेर मतदारसंघ,गिरीश देशमुख शहर अध्यक्ष,परेश देशमुख,विनोद पाटील सूतगिरणी संचालक,रविंद्र चौधरी,महिला तालुकाध्यक्ष सविताताई विनोद पाटील,महिला शहर अध्यक्ष स्वातीताई बडगुजर, कार्यध्यक्ष मायाताई महाजन,उपाध्यक्ष जयश्री पाटील,रवींद्र धनगर,मिलिंद सोनवणे,गोपाल दाभाडे,सनी सचदेव,शुभम सोनवणे,आणि ईतर पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More