धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस सहा महिने शिक्षेचा निकाल …# तब्बल 12 वर्षानंतर मिळाला न्याय
चोपडा – अमळनेर येथील आरोपी राकेश सुरेश पाटील रा.श्रीराम कॅालनी यांनी फिर्यादी निवृत्त पं.स.कर्मचारी हेमंतकुमार भागवतराव देशमुख रा.पाटील गढी चोपडा यांचेकडून २०११ मध्ये हॅाटेल व्यवसायासाठी हात उसनवार म्हणून रुपये एक लाख सत्तर हजार रुपये घेतले होते.


त्या बदल्यात आरोपीने फिर्यादी देशमुख यांना दि.३० अॅागस्ट २०१२ मध्ये धनादेश दिला होता.सदरचा धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादी यांनी अमळनेर न्यायालयात ३५/२०१३ नुसार आरोपी विरूद्ध निगोशिएबल इन्स्ट्रयुमेंट ॲक्ट कलम १३८ नुसार खटला दाखल केला होता. त्या खटल्याचा निकाल न्या.एन.आर.येलमाने यांनी नुकताच दिला आहे.त्याप्रमाणे आरोपीला सहा महिने साधी कैद व दोन लाख ८९ हजार रुपये आरोपीनी फिर्यादीस द्यावेत असा आदेश केला आहे.फिर्यादी तर्फे ॲड.प्रशांत आर.बडगुजर यांनी काम पाहिले.














