चित्रकार व मूर्तिकार श्री अनिलराज पाटील यांच्याकलाकृतींची यशोपताका नागपुरात फडकली…

चित्रकार व मूर्तिकार श्री अनिलराज पाटील यांच्या
कलाकृतींची यशोपताका नागपुरात फडकली…

नागपूर येथील ऋणानुबंध फौंडेशन यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर शिव उत्सव ही महाप्रतियोगिता आयोजित केली होती. या चित्रकला स्पर्धेत चोपडा येथील चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांचे राजा शिवछत्रपती या स्टिपलिंग कला प्रकारातील चित्राची निवड करण्यात आली.

देशभरातील हजारो चित्रकारांनी यात सहभाग नोंदवला होता परंतु मोजक्या उत्कृष्ट कलाकृतींची यात निवड करण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या व्यक्ती चित्र स्वरूपातील कलाकृतींचे सादरीकरण अपेक्षित होते. या चित्रांचे लवकरच नागपूर येथे भव्य प्रदर्शन भरविले जाणार आहे. श्री अनिलराज पाटील यांनी या आधी देखील अनेक वेळा राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला , या स्पर्धेमध्ये चित्रांची बहुतांश वेळा निवड होऊन प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांकाच्या बक्षिसांची यशोपताका सातत्याने वाढती राखली आहे.

या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे बाविस्कर परिवार अडावद ,
जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ , चित्रकार व शिल्पकार संघटना महाराष्ट्र राज्य , मराठा सेवा संघ , जळगाव , सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था , चोपडा
स्नेही व सर्व मित्र परिवार तर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More