चोपडा ग्रामिण पोलिसांची मोठी कारवाई ५ गावठी कट्टे १० जिवंत काडतुस, व १ धार-धार कोयतासह दोन आरोपी ताब्यात

चोपडा ग्रामिण पोलिसांची मोठी कारवाई
५ गावठी कट्टे १० जिवंत काडतुस, व १ धार-धार कोयतासह दोन आरोपी ताब्यात

चोपडा (प्रतिनिधी)— येथिल ग्रामिण पोलिस स्टेशनचे पो.नि कावेरी कमलाकर याना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी सापळा रचून दि.२७ संध्याकाळी ७;३० वाजता चोपडा ग्रामिण पोस्ट लासुर गावचे हद्यीत लासुर ते सत्रासन जाणारे रोडवर येणार जाणारे वाहन थांबवुन त्यांना चेक करत असताना त्यावेळी ७;३० वा च सुमारास एका मोटार सायकलवर उत्तमनगर ते लासुर जाणारे रोडने एका निळे रंगाची मोटार सायकलवर दोन इसम आले आम्ही त्यांना थांबवले असता तेव्हा पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी त्यांचे नांव गांव विचारले तेव्हा मोटार सायकल चालक (छ. संभाजी नगर) असे असल्याचे सांगीतले व त्याचे पाठीमागे बसलेल्या इसमास नांव गावं विचारता त्याने त्याचे नांव २) इरफानखान अयुबखान वय २३ रा. नाकसीन कॉलनी जिन्सी पोलीस स्टेशन जवळ, ता.जि. औरंगाबाद, (छ.संभाजी नगर) असे असल्याचे सांगीतले तेव्हा सदर मोटार सायकलवरील दोन्ही इसमांचे त्याचे मधोमध एक काळे रंगाची सेंक (बॅग) होती तेव्हा पो.नि कावेरी कमलाकर यांनी त्यांचे जवळ असलेल्या काळे रंगाच्या बॅग मधे काय आहे हे विचारले तेव्हा त्यामध्ये मोटार सायकल चालक मोहम्मद लतीफ शेख याने सदर बॅग मध्ये गावठी कट्टे असल्याचे सांगीतल्याने त्यामध्ये ५ गावठी कट्टे १० जिवंत काडतुस, व १ धार-धार कोयता मिळून आला तेव्हा त्यांना सदरचे कट्टे हे कोणाकडुन व कितीला आणले आहेत असे विचारले तेव्हा त्यांनी सदरचे कट्टे हे प्रत्येकी २५,०००/- रुपयाला पारउमर्टि येथुन आणले असून १ राऊंड (काडतुस) हे प्रत्येकी १,०००/- रुपयाला सुजितसिंग बर्नाला रा. मध्यप्रदेश याचे कडुन घेतले असल्याचे सांगीलते असुन सदर कट्टे मधुन आम्ही पारउमर्टि, ता. वरला येथून आणले असल्याचे सांगितले


पो कॉ रावसाहेब एकनाथ पाटील यांचा फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम वय २४ वर्षे, रा. नारेगांव गल्ली नंबर ४ मानीनगर ता.जि. औरंगाबाद, इरफानखान अयुबखान वय २३ रा. नाकसीन कॉलनी जिन्सी पोलीस स्टेशन जवळ, जिल्हा औरंगाबाद, (छ.संभाजी नगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आले. यांच्याकडे मिळालेला माल २५,०००/- रु. किंमतीचे एक काळे रंगाचा लोखंडी, स्टिलचा धातूची बनावटी पिस्टल (कट्टा) मॅक्झिानसह ,१०,०००/- रु.कि.चे पिवळया धातुचे १० जिवंत काडतुस, ५०,०००/- रु. किंमतीचे निळे रंगाची सुझुकी मोटार सायकल,१०,०००/- रु कि चा मोबाईल हॅन्डसेट १०,०००/- रु.कि चा मोबाईल हॅन्डसेट आरोपी ,१०००/- रु कि.चा एक धार-धार लोखंडी कोयता, ७४०/- रुपये रोख २,०६,९४०/- रु.एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आले यांची अवैधपणे विक्री करण्याचे उद्येशाने मिळून आल्याने त्यांचे कब्जात वरील वर्णनाचा एकुण २,०६,९४०/- रु.कि.चा माल मिळुन आला
तसेच पो.ना. शशिकांत पारधी पो.को. राहुल रणधीर, पो.का. दिपक शिंदे,अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More