देवेंद्र पाटील यांची केंद्रप्रमुख पदी पदोन्नतीने नियुक्ती

देवेंद्र पाटील यांची केंद्रप्रमुख पदी पदोन्नतीने नियुक्ती

चोपडा तालुक्यातील विज्ञान पदवीधर शिक्षक देवेंद्र भास्कर पाटील यांची नुकतीच केंद्रप्रमुख पदावर चोपडा तालुक्यातील समूह साधन केंद्र नागलवाडी येथे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली.

ते ग.स. सोसायटी जळगावचे माजी संचालक असून. अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस म्हणून काम सांभाळतात. त्यांनी अनेक प्रशिक्षणांमध्ये राज्यस्तर,विभागस्तरावर तज्ञमार्गदर्शक म्हणून काम केले आहे. याआधी त्यांनी विषयतज्ञ, गटसमन्वयक म्हणून गट साधन केंद्र पंचायत समिती चोपडा येथे काम केले आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल श्री अविनाश पाटील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील कर्मचारी व नागलवाडी केंद्रातील शिक्षकांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.
येत्या काळात नागलवाडी केंद्र मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात, गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More