धरणगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

धरणगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

धरणगाव प्रतिनिधी:- योगेश पाटील

10 ऑगस्ट रोजी धरणगाव तालुकास्तरीय १४/१७/१९ वर्ष मुला मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन धरणगाव तालुका क्रीडा संकुल येथील हॉलमध्ये करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन पीआर हायस्कूलचे क्रीडाशिक्षक आदरणीय डी एच कोळी सर यांनी केले स्पर्धेविषयी सविस्तर मार्गदर्शन क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर यांनी केले पंच म्हणून केदार भाटिया रोहित सपकाळे यांनी काम पाहिले

तर स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री वाय ए पाटील सर जितेंद्र ओस्तवाल सर पवन बारी सर यांनी सहकार्य केले या स्पर्धेत 14 वर्षे गटात लिटल ब्लाझम स्कूल धरणगाव 17 वर्षे आतील गटात पी आर हायस्कूल धरणगाव 19 वर्षे आतील गटात ए सी एस कॉलेज धरणगाव च्या संघांनी विजय संपादन केला विजय झालेल्या सर्व खेळाडूंना जिल्हास्तरावर खेळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सूत्रसंचालन जितेंद्र ओस्तवाल सर यांनी केले तर आभार वाय ए पाटील सर यांनी मानले स्पर्धा अत्यंत खेळीमेडीच्या वातावरणात पार पडल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More