राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार ;# चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क

मुंबई,दि.१८ : राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी " बांधा वापरा हस्तांतरित करा " या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. विधानभवन येथे राज्य परिवहन विभागाच्या चोपडा आगारातील विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनावणे, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख उपस्थित होते.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, शहर,तालुका व ग्रामीण भागातील परिवहन व्यवस्था बळकटीकरणासाठी " बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक करण्यात यावे याबाबतीत स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या विनंतीवरून विधानभवनात परिवहन मंत्री श्री. प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला आदिवासीबहुल तालुका म्हणून चोपडा तालुका ओळखला जातो तसेच राज्यस्तरावर आयोजित स्पर्धेत चोपडा आगाराला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले असल्याने एक महत्वाचे बसस्थानक म्हणून चोपडा बसस्थानकास अत्याधुनिक सोयीयुक्त बनविण्यात यावे अशी मागणी केली.

याबाबतीत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर चोपडा बसस्थानक विकसित करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा आगारासाठी ३० नवीन बसेसची मागणी केली यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी लवकरच चोपडा आगारासाठी नवीन बसेस देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More