चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील वैजापूर येथे विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा – अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त
दि, 19जून २०२५– मौजे वैजापूर ता. चोपडा ज़ि. जळगाव येथे जिल्हा स्तरीय भरारी पथकाने चोपडा तालुक्यातील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र, वैजापूर येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला.

मौजे वैजापूर ता चोपडा येथे न्यू लक्ष्मी कृषि केंद्राचे प्रो. प्रा. योगीराज देवसिंग पाटील वय 30 वर्ष रा. नागलवाडी हे 25 मे 2025 पासून विना परवाना अनधिकृतपणे बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याचे आढळून आले. मात्र योगीराज पाटील हे शासनाची दिशाभूल करून मौजे वैजापूर येथे बियाणे, आणि खत परवाना न घेता अनधिकृत कृषि केंद्र मार्फत खते आणि बियाणे ची सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले.

सबब ज़िल्हा स्तरीय भरारी पथकानें छापा टाकून कृषि केंद्रात विना परवाना विक्री साठी साठवून ठेवलेले सुमारे 20 टन (405 गोण्या ) चार लाख 52 हजार 446 रकमेचे रासायनिक खत आणि मका आणि कापूस या पिकांचे रु 283418 रकमेचे 188 बियाणे पॅकेट्स असे एकूण रु 735864/-रकमेचे रासायनिक खत आणि बियाणे जप्त करून या साठ्यास विक्री बंद आदेश देण्यात आला.

सबब श्री विकास बोरसे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्री योगीराज देवसिंग पाटील यांनी बियाणे कायदा 1966,बियाणे नियंत्रण आदेश 1983,,खत नियंत्रण कायदा 1985, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 यातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या भरारी पथकात श्री अविनाश खैरनार मोहीमं अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, किरण पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती चोपडा, रामचंद्र पाटील मंडळ कृषी अधिकारी हातेड तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी संयुक्त कायदेशीर कारवाई केली.. सदरील कारवाई ही जिल्हाधीकारी आयुष प्रसाद ,मा.मु.का.अ मिनल करनवाल मैडम , मा.संचालक ,गु.नि सुनील बोरकर, मा.विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मा.ज़िल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.कुरबान तडवी, कृषि विकास अधिकारी पदमनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शननुसार करण्यात आली.













