भुसावळ शहरात आज पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले जळगाव@455

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 झाली

जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ कॉलनी, गांधीनगर व दिपनगरातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ( 455) झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More